माडखोलकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना वीमा सल्लागार अशोक दळवी, शेजारी प्रा. एस. के. सावंत, प्रा. डॉ. एस. एस. सावंत |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"सुस्पष्ट दृष्टिकोनाचा अभाव आणि न्यूनगंड हाच व्यावसायिक देशातील मोठा अडथळा आहे. विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या खंबीर असले पाहिजे. नवनवीन संधीचा शोध घ्यावा. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अशक्यप्राय गोष्टीही साध्य होतील. 'असे प्रतिपादन वीमा सल्लागार अशोक दळवी यांनी केले. चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात व्यवसाय दृष्टिकोण आणि शेअर बाजार या अभ्यासक्रमांतर्गत कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. एस. के. सावंत होते.
अध्यक्षीय भाषणात प्रा. सावंत यांनी "विमा व्यवसायातील संधी हा रोजगाराचा एक चांगला पर्याय असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविकातून प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांनी शेअर बाजारातील उत्पन्नांच्या सुसंधी कडे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने पाण्याची गरज विशद केली. महेक नेसरीकर हिने सूत्रसंचालन केले तर प्रियांका बामणे हिने आभार मानले.
No comments:
Post a Comment