![]() |
सातवणे येथे शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया व हूमणी किड नियंत्रण मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी सुनिल जगताप |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर परिसरात खरीप हंगामाची तयारी सुरु असून तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्याना खरीपाची पेरणी कसी करावी? याची प्रात्यक्षिके करून दाखवली जात आहे. त्याचबरोबर बिज प्रक्रिया व हूमणी नियंत्रणाचे मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
बिजप्रतियेमुळे शेतकऱ्यांची पेरणीची शंभर टक्के उगवण क्षमता निर्माण होते. यामुळे तालुका कृषी अधिकारी सुनिल जगताप यांनी शेतकऱ्यांना बिजप्रक्रियेचे महत्व पटवून देत आहेत. बीजप्रक्रिया करताना भविष्यात निर्माण होणाऱ्या रोगापासून बचाव होतो. तसेच बीजप्रक्रिया केल्यास खताच्या बचती मध्ये वाढ होते. मंडळ अधिकारी अक्षय गार्डे यांनी शेतकऱ्याना बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हुमणी किडीचा प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होते. जोमात आलेली पिक या किडीमुळे जमीन होते. यासाठी चाळोबा येथील मिलिंद घोळसे यांच्या शेतावर प्रकाश सापळे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये प्रात्यक्षिक करताना शेतकऱ्यांना प्रकाश सापळे हे हुमणी नियंत्रणासाठी प्रभावी साधन आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायीकरित्या प्रकाश सापळा मोहीम राबवावी. आपल्या शेतावर प्रकाश सापळा तयार करावा. यामुळे हुमणीवर नियंत्रण मिळवता येईल. यावेळी साहाय्यक पी. बी. केंद्रे, खंडू साबळे व शेतकरी उपस्थित होते.
प्रकाश सापळे
शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे तयार करताना उसाच्या क्षेत्राच्या कडेला छोटासा खडा खोदून त्यामध्ये प्लास्टीक कागद अंथरून अधी खड्डा भरावा. त्यामध्ये २० ते ३० मिली रॉकेल / डिझेल / पेट्रोल कोणतेही कीटक नाशक टाकावे. त्यावर एक ते दिड फुट उशीवर 200 वॅटचा बल्ब लावावा.तो रात्री ७ ते ९ या वेळेत चालू ठेवावा.
No comments:
Post a Comment