पारगड येथे रविवारी व सोमवारी शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2022

पारगड येथे रविवारी व सोमवारी शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन

 

संग्रहित शिवराज्याभिषेक सोहळा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         मजरे कारवे (ता. चंदगड) येथील शहीद जवान वेलफेअर फाऊंडेशन व ग्रामस्थ मंडळ पारगड यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन करणे आले आहे. सोहळा दि. ५  व ६ जून रोजी पारगड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग बेनके यांनी दिली. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या संसर्गामुळे साधेपणात पार पडला होता. यावेळी दिमाखात साजरा करण्याचे नियोजन वेल्फेअर फाउंडेशन व पारगड ग्रामस्थांनी केले आहे. 

      ५ जून रोजी सायंकाळी चार वाजता गड स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर गड सजावट, गड पूजन, राष्ट्रभक्तीधारा गीते, मशाल फेरी, गड देवता, भवानी देवीचा गोंधळ, किर्तन व गड जागरण असे कार्यक्रम होणार आहेत. तर दि. ६ जून रोजी पहाटे सहा वाजता काकड आरती त्यानंतर ध्वजारोहण, भंडारा उधळण व शस्त्रपूजन सकाळी ९ ते १०  वाजता शिवकालीन युद्ध कलांचे प्रात्यक्षिक, १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तसेच ११ ते १२ वाजेपर्यंत शाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा रंगराव पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच लखन गुरुजी व त्यांच्या शिष्यांचे मर्दानी खेळ सादर केले जाणार आहेत. अश्या विविध कार्यक्रमांनी सोहळा पार पडणार आहे. मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक  सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment