चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कानुर बुद्रुक (ता. चंदगड) येथे स्मशानशेड नसल्याने पावसळयात होणाऱ्या मयतावर अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तात्काळ स्मशानशेड मंजूर करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कानुर बु.गावाला जिल्हा परिषदेचे सभापती होण्याचा बहुमान मिळाला, अनेकजण सरपंच झाले. या भागातील पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य झाले. परंतु कोणीही याबाबत दखल घेऊन स्मशानशेड बांधण्यासाठी प्रयत्न करुन स्मशानशेड बांधले नाही. चार दिवसापुर्वी गावामध्ये ४० वर्षाचा तरुण मयत झाला. पावसाचा जोर वाढल्याने अंत्यविधी करताना अडचणी आल्या. गावातील ७-८ तरुणांनी डिजीटल बॅनरचा कृत्रीम शेड उभा करुन अंत्यविधी मध्ये कोणताही अडथळा येणार नाही यासाठी धडपड करुन, अंत्यविधी पार पाडला. यापुर्वी स्मशानभुमीकडे जाणारा रस्ताही काही लोकांनी अडविला होता. एखाद मयत झालच तर उसाच्या सरीमधून प्रेत घेवून जाताना कसरत करावी लागत होती. परंतु याच तरुणांच्या पुढाकाराने सद्या रस्ता खुला करुन मिळाला आहे. स्मशानशेड बांधून मिळण्यासाठी यापुर्वी ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन देवून देखील कोणतीच यंत्रणा दखल घेत नसलेने याबाबत आंदोलन उभा करण्याचा इशारा डॉ. कृष्णा गणाचारी, अॅड. हणमतराव देसाई, संजय आगाशे, विजय गणाचारी, शिवाजीराव साखरदांडे, गजानन गणाचारी, सुमित देसाई, अशोक परीट, संजय गणाचारी, संतोष यादव, गिरीश बांदेकर, निवृत्ती गुरव, प्रदीप गुरव, सचिन साबळे, धोंडिबा गुडुळकर आदी तरुणांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment