शिक्षक बँकेच्या प्रगतीसाठी सभासद संघाचे सत्तारूढ पॅनेल विजयी करणार - राज्याध्यक्ष वरुटे - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2022

शिक्षक बँकेच्या प्रगतीसाठी सभासद संघाचे सत्तारूढ पॅनेल विजयी करणार - राज्याध्यक्ष वरुटे

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विचारांचा वारसा चालवत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करत संघटना मजबूत केली आहे याच बरोबर विद्यमान संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सभासद मयत झालेस २५ लाखापर्यंत कर्ज माफ करणे सर्वसामान्य सभासदांना एक लाख तर डीसीपीएस धारक सभासदांना पाच लाखाची मदत केली जाते. भविष्यात राष्ट्रीयीकृत बँके प्रमाणे व्याजदर करण्याचा प्रयत्न असून सभासदाभिमुख घेतलेल्या निर्णयामुळे यावेळीही शिक्षक बँकेच्या प्रगतीसाठी सुज्ञ सभासद  शिक्षक संघाचे पॅनेल विजयी करणार असल्याचा विश्वास राज्याध्यक्ष राजाराम वरुट यांनी व्यक्त केला.

   ते पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्हि. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघ पॅनेलच्या प्रचार सांगता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रमेश हुद्दार होते. कार्यकारिणीच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यमान संचालक शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविकातून शिक्षक बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख सांगत चंदगड तालुक्यातील नेहमीच निर्णायक मोठी मतांची आघाडी दिली आहे. हीच परंपरा चंदगड तालुका या निवडणुकीत जोपासणार असल्याचे सांगितले. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांनी संघटना शिक्षकांचे प्रश्न जाणून घेऊन बदली इच्छुकांच्या बदल्या मुख्यालय राहण्याची अट शिथिल करणे एमएससीआयटी वसुली थांबवणे विज्ञान विषय शिक्षकांना आदेश मिळवून देण्यासंदर्भात वेळोवेळी राजाराम वरुटे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ सक्षमपणे कार्य करत आहे. यामुळेच शिक्षक संघाची एक हाती सत्ता शिक्षक बँकेत येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे चेअरमन बाजीराव कांबळे, पाटील, नामदेव रेपे, स्मिता डिग्रजे, अशोक नौकुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चंदगडच्या अभेद्य व संघटना बांधणी बद्दल सर्व कार्य करणीचे अभिनंदन केले. याचबरोबर शिक्षक संघाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या श्री देव वैजनाथ शिक्षक पतसंस्था पारगड शिक्षक पतसंस्था जिज्ञासा शिक्षक पतसंस्था यांच्या यशस्वी वाटचालीचे अभिनंदन केले.

यावेळी  उमेदवार सदानंद पाटील, बी. एस. पाटील, बबन केकरे, राजेंद्र मांडेकर, पांडुरंग रावण, अजित मजलेकर, डी. पी. पाटील, मारुती दिंडे,  अनिल चव्हाण, मायकेल फर्नांडिस, बाबा साळुंके, श्रीपती तेली, काशिनाथ कुंभार, संभाजी सिद, मदनकुमार कांबळे, लता नायकवडे, अनिता निटवे यांनी स्वतःची ओळख करून देत आपले कार्य सांगितले व संपूर्ण शिक्षक संघाच्या पॅनेलला विमान चिन्हावर शिक्का मारून सर्व सतरा उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान केले. 

         याप्रसंगी रवींद्र नागटीळे, बजरंग लगारे, उत्तम सुतार, अरुण पाटील, प्रशांत पोतदार, साहेब शेख, जी. एस. पाटील, वसंत जाधव, भैरवनाथ शिंदे, विशाल प्रभावळे, भरमू तारीहाळकर, अनंत मोटर, टी. जे. पाटील, डी. बी. पाटील, शाहू पाटील, परशराम नाईक, बाळाराम नाईक, रमेश नाईक महिला आघाडीच्या अनिता कंग्राळकर, प्रमिला कुंभार कविता पाटील , अलका पाटील, सरोजनी सांगावकर  यांच्यासह चंदगड तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बँकेचे सभासद व प्राथमिक शिक्षक संघ परिवार, पदवीधर शिक्षक सभा विमुक्त शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना, शिक्षण सेवक संघटना, डीसीपीएस संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन सट्टूप्पा फडके यांनी केले तर आभार दस्तगीर उस्ताद यांनी मानले.

No comments:

Post a Comment