चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
काटामारीतुन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. यासाठी प्रत्येक गावपातळीवर शेतकऱ्यांनी जागरुक रहावे, होईल तो दर देतो या भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, काजू संघर्ष समितीची व्याप्ती वाढवण्यासाठी चंदगड बरोबरच गडहिंग्लज, आजरा, खानापुर व बेळगाव तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करुन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बळीराजा काजू दर संघर्ष समिती करण्याविषयी व शेतकरी कंपनी स्थापन करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. योग्य पद्धतीने काजू साठवलेल्या शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता संयम राखावा असे आवाहन बळीराजा काजू दर संघर्ष समितीचे प्रमुख नितीन पाटील यानी केले. ते कार्वे (ता. चंदगड) येथे बळीराजा काजू दर संघर्ष समिती मार्फत आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होता. अध्यक्षस्थानी रमेश देसाई होते.
यावेळी नितीन पाटील यांनी काजू दर संघर्ष समितीच्या कार्याचा आढावा घेतला. परदेशी काजू संदर्भातही या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी खासदारांना सुचित करण्याचे ठरले. त्याचबरोबर काजूदर संघर्ष समिती कार्यकारिणी निवडीसाठी शेतकर्यांना समितीच्या वतीने सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक एम. के. पाटील यांनी केले, तर यावेळी एस. एन. देसाई, सुरेश हरेर, बापू होडगे, धोंडिबा चिमणे यांनीही बैठकीला मार्गदर्शन केली. यावेळी नरेंद्र पाटील, नामदेव पाटील, कृष्णा पाटील, दयानंद भादवनकर, विठ्ठल गावडे, रणजित गणाचारी, मारुती गणाचारी, गजानन हान्नुरकर, प्रमोद ओऊळकर, मारुती जाधव, आनंद भोसले, संजय कडूकर, , किरण शिंदे, रामा गावडे आदी उपस्थित होते. या बैठकीला काजू उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार जयसिंग देसाई यांनी मानले.
No comments:
Post a Comment