राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड येथे मनसेच्या वतीने पत्रकारांना छत्री रेनकोटचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2022

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड येथे मनसेच्या वतीने पत्रकारांना छत्री रेनकोटचे वाटप

मनसेच्या वतीने पत्रकारांना छत्री व रेनकोट भेट देताना राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे, जिल्हाउपाध्यक्ष विवेक पाटील, जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील स्विकारताना पत्रकार नंदकुमार ढेरे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंदगड तालुक्यातील पत्रकारांना मनसेचे कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या पुढाकाराने रेनकोट व छत्र्यांचे वाटप  करण्यात आले. 

         प्रारंभी कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील यांनी पत्रकार हा वेळी अवेळी वृतसंकलनासाठी बाहेर पडत असतो. प्रसंगी तो प्रकृती कडे दुर्लक्ष करतो. म्हणुन पावसाळ्याच्या तोंडावर चंदगड तालुक्यातील सर्व पत्रकारांना रेनकोट व छत्र्या वाटप केल्याचे सांगितले.

        यावेळी राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे यांनी ``लोकशाहीत चौथा खांबाचे रक्षण करणारे पत्रकार सामाजिक दृष्ट्या मात्र दुर्लक्षित राहतात. यासाठी सामाजिक भावनेतून चंदगड तालुक्यातील पत्रकारांना पावसाळ्यासाठी रेनकोट व छत्र्यांचे वाटप केल्याचे सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी समाजाचे संतुलन योग्य राखण्याचे काम पत्रकार करत असतात. ग्रामीण पत्रकारांची वृत संकलन करण्यासाठी मोठी धडपड असते. त्या प्रमाणात त्यांना सोयी सवलती मिळत नाहीत. पत्रकारांनी शोधून काढलेल्या विषयावर अंदोलने करून बरेच विषय मार्गी लावल्याचेही श्री. चौगुले यानी सांगितले. यावेळी पत्रकार विजयकुमार दळवी व सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे यांनीही मनोगत व्यक्त केली.

    कार्यक्रमाला जिल्हाउपाध्यक्ष विवेक पाटील, तालुकाध्यक्ष परशराम मळवीकर, अमृत गावडे, तुकाराम पाटील, विक्रम तानगावडे, नितीन राऊत, सुजित देसाई, जोतीबा करटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आभार अभिजीत जोशिलकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment