चंदगड महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना प्रा. आर. व्ही. आजरेकर, |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
एकविसाव्या शतकामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याजवळ संगणक साक्षरता असणे ही काळाची गरज आहे असे मत प्रा. आर. व्ही. आजरेकर यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, संगणकाचे ज्ञान हे अनेक कौशल्या पैकी एक महत्त्वाचे कौशल्य आहे ज्यामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होते. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी क्षेत्राबरोबरच वैयक्तिक व्यवसायातही संगणकाचे ज्ञान व्यक्तीला कायम उपयोगी पडते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळाच्या पाऊलखुणा ओळखून हे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे असे ते यावेळी म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये संगणकाचे ज्ञान विध्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवते असे मत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. एन. के. पाटील सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. बी. दिवेकर यांनी केले तर आभार प्रा. आर. के तेलगोटे यांनी मानले.
No comments:
Post a Comment