वाचनाने जीवन समृध्द होते - प्राचार्य आर. पी. पाटील, शाहू जयंती निमित्त दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी शाहू वाचन कट्ट्याचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2022

वाचनाने जीवन समृध्द होते - प्राचार्य आर. पी. पाटील, शाहू जयंती निमित्त दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी शाहू वाचन कट्ट्याचे उद्घाटनचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          'वाचनाने जीवन समृद्ध होते. सुखाचा राजमार्ग पुस्तकांच्या वाटेवरूनच जातो. 'असे मत प्राचार्य आर. पी. पाटील यांनी मांडले. ते राजर्षी शाहू वाचन कट्ट्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

          आजच्या मोबाईल इंटरनेटच्या  जमाण्यात मुलांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. अशी पालकांची नेहमी ओरड होत असते. हाच मुद्दा घेऊन दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वाचन कट्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाहू जयंतीचे औचित्य साधून दि न्यू इंग्लिश स्कूलचे ग्रंथपाल शरद हदगल यांनी प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन कट्टा हा उपक्रम राबविला. 

            यावेळी उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यानी वाचनाचे महत्व अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. ग्रंथालयात एकूण बारा हजार पुस्तके आहेत. विद्यालयातील दैनदिन कामकाजात मोकळ्या तासिकेला, शाळा सुरु होण्या पूर्वी मिळालेल्या वेळेत वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रंथालयाच्या बाहेर वाचन कट्ट्याची निर्मिती केली आहे. यामध्ये वर्तमानपत्रे, विविध मासिके, साप्ताहिके उपलब्ध करून दिली आहेत. कु. झोया मुल्ला हिचे वाचना संदर्भात भाषण झाले.

          कार्यक्रमाला एन. डी. देवळे, टी. एस. चांदेकर, एम. व्ही .कानूरकर, जे. जी. पाटील, व्ही. के. गावडे, टी. टी. बेरडे, एस. जी. साबळे, डी. जी. पाटील, बी. आर. चिगरे, व्ही. टी. पाटील, एस. जे. शिंदे, सूरज तुपारे, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, विद्या शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे तर आभार  एम. व्ही. कानूरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment