गोवेंकरांच्या पायी पंढरपूर दिंडीचा चंदगडमध्ये आज नामघोष, आमोणा येथील ६५ वारकऱ्यांचा वारीत समावेश - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2022

गोवेंकरांच्या पायी पंढरपूर दिंडीचा चंदगडमध्ये आज नामघोष, आमोणा येथील ६५ वारकऱ्यांचा वारीत समावेश



तेऊरवाडी / एस. के. पाटील

          हिचोली ओम नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ, अमरावती आमोणा (गोवा) या वारकरी मंडळातर्फे सांखळी मतदारसंघातून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर पायीवारीची शुक्रवार दि. २४ जून रोजी सकाळी आमोणा येथून सुरवात झाली. या वारीत ६५ पुरुष महिला वारकरी सहभागी झाले आहेत. या वारकरी मंडळाच्या या वारीला घाडीवाडा आमोणा येथून प्रारंभ झाला. 

             यावेळी महिला नेत्या सुलक्षणा सावंत, सेसाचे अधिकारी मिलिंद बर्वे, सर्वेश फुलारी, संतोष नाईक, काशिनाथ म्हाथो, श्रीपाद घाडी व इतर  मान्यवर उपस्थित होते. सुलक्षणा सावंत डोक्यावर तुळस घेऊन या वारीत सहभागी झाल्या आहेत . पंढरपुरची वारी जगात प्रसिद्ध असून वारकरी कौतुकास पात्र आहेत असे सांगून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या . ओम नमो ज्ञानेमाऊली वारकरी मंडळ अमरावती आमोणा मध्ये अगदी १८ वर्षाच्या यूवतीपासून ६५ वर्षाच्या वृद्धेपर्यंत . वारकरी सहभागी झाले आहेत . आज या दिंडीने चंदगड तालूक्यातून प्रवास केला . यावेळी अनेक वारकऱ्यांच्या  खांदयावर भगवी पताका व विना , डोईवर तुळस  हातामध्ये चिपळ्या  , हातात टाळ , मृदंग व मुखी हरिनामाचा जयघोष करत विठ्ठलभक्त तल्लीन होऊन पंढरीची वाट जवळ करत होते .

             नाम गाऊ नाम घेऊ , नाम विठोबाचे गाऊ , आम्ही दैवाचे दैवाचे , दास पंढरी रायाचे , मी नाचतो गातो आनंदे म्हणत चंदगच्या रस्त्यावरून अंगावर पावसाच्या सरी झेलत हे भक्तजन मार्गस्थ होत आहेत .आज आंबोली नंतर या दिंडीने चंदगड तालूक्यातून अडकूर मार्गे प्रवास करत गडहिंग्लज तालूक्यात प्रवेश केला .आज हि दिंडी नेसरी परिसरात विसावा घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहे. 

No comments:

Post a Comment