आषाढी यात्रेवर १५० सीसीटीव्ही, ४ ड्रोन कॅमेऱ्यांचे राहणार लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2022

आषाढी यात्रेवर १५० सीसीटीव्ही, ४ ड्रोन कॅमेऱ्यांचे राहणार लक्ष


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व पंढरपूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ५ कोटी ७९लाख रुपयांचे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. दरम्यान, वारीनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपुरात साडेसहा हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. 

      १० जुलै रोजी आषाढी वारी असून यानिमित्ताने सर्वच विभागांनी जय्यत तयारी केली आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे. आषाढी वारी मोठ्या उत्साहात होणार आहे. यावर्षी पंढरपुरात १७ लाख भाविक दाखल होतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानेही ६ते १४ जुलै याकाळात २००एस.टी. बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. दरम्यान, पंढरपुरात वारीच्या वेळी गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४ ड्रोन कॅमेरे लावले जातील शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पोलिसांनी त्यासाठी ३३ ठिकाणे निश्चित केली असून त्याठिकाणी १५० सीसीटीव्ही बसविण्यात येईल. २४ तास सुरू असणाऱ्या या सीसीटीव्हींचा सर्वात जास्त उपयोग व फायदा हा पोलिसांनाच होणार आहे.No comments:

Post a Comment