माजी विद्यार्थ्यांनी केली 'ताम्रगड प्रतिष्ठान' ची स्थापना..! - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2022

माजी विद्यार्थ्यांनी केली 'ताम्रगड प्रतिष्ठान' ची स्थापना..!



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा  

              शिवाजी विद्यापीठाचे इंग्रजी विषयाचे पहिले पीएचडी धारक प्राचार्य कै डॉ. डी. व्ही. तोगले (मुळगाव किणी, ता. चंदगड) यांनी शिवराज महाविद्यालयात अध्यापन करताना चंदगड तालुक्यातील अनेक विद्यार्थी घडवले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येत नुकतीच ताम्रगड प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला. 

         जयप्रकाश विद्यालय किणी येथे पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आतंरराष्ट्रीय स्तरावर गेली २५ वर्षे काम केलेले एन आर पाटील होते. स्वागत प्रतिष्ठानचे खजिनदार दयानंद सलाम यांनी केले. प्रास्ताविक संस्था सचिव सुभाष बेळगावकर यांनी केले.

         यावेळी बोलताना एन. आर. पाटील यांनी ज्ञान, सातत्य, सत्यता, एकात्मता या तत्त्वाने अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या समाजाच्या मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करील असे सांगितले. प्रतिष्ठानची व्याप्ती वाढविण्यासाठी डॉ. तोगले सरांच्या काळात गडहिंग्लजला शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने यात कार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.

           यावेळी केशव पाटील, नामदेव धनकुटे, सुहास पाटील, एस. आर. पाटील, अनिल पाटील, एस. पी. पाटील, एस. ए. पाटील, अजित पाटील, गुलाब पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

          बैठकीला सुधीर पाटील, संजय मुंगारे, खंडेराव देसाई, अजित देसाई, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय कुट्रे, सहसचिव पद्माकर गवेकर, सहखाजिनदार प्रा. शशिकांत खोराटे आदींची उपस्थिती होती. आभार नरेंद्र हिशेबकर यांनी मानले.




No comments:

Post a Comment