थकित पगारासाठी प्राथमिक शिक्षकांचे २० जूनला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2022

थकित पगारासाठी प्राथमिक शिक्षकांचे २० जूनला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

               कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे २०२२ या महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगार देणे अपेक्षित असताना एक ते दीड महिना उलटूनही दोन दोन महिन्याचा पगार होत नाही. यामुळे कर्जांवरील व्याज वाढण्याबरोबरच प्राथमिक शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

          प्रत्येक महिन्याचा पगार एक तारखेला झालाच पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) यांच्या वतीने सोमवार दिनांक २० जून रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे. असे आवाहन प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना देण्यात आले असून निवेदनावर अध्यक्ष संभाजी बापट, कार्याध्यक्ष वसंत जाधव, कोषाध्यक्ष एम एम गुरव, सरचिटणीस उत्तम सुतार आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment