भारतीय किसान संघ यांच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2022

भारतीय किसान संघ यांच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न

आरोग्य शिबीर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         भारतीय किसान संघ, चंदगड आणि सनराईज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर तर्फे ९ जून २०२२ रोजी श्री राम मंदिर येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. सांधेदुखी, हृदयविकार, प्रोस्टेट, किडनी विकार, मुतखडा इ. आजारासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. चंदगड आणि आजूबाजूच्या २५ गावातील जवळपास १२५ लोकांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेतली.

            भारतीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या गावातून प्रत्यक्ष जाऊन लोकामध्ये शिबिरविषयी जागृती केली.

      सनराईज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे लोकांना या आरोग्य शिबिरातून मोफत औषधे पण उपलब्ध करून दिली गेली. या शिबिरासाठी सनराईज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर चे ५ डॉक्टर्स  व १० सपोर्ट स्टाफ असे एकूण १५ जणाच्या स्टाफने लोकांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत लोकांची आरोग्य तपासणी करून मोठे सहकार्य केले. भारतीय किसान संघाचे सिद्धार्थ शिंदे, अनिकेत मांद्रेकर, विवेक सबनीस, सुभाष आजरेकर सर, मनोज नाडगौडा, दिलीप गावडे, गुरुदत्त फडणीस, मच्छिंद्र गुरव, प्रल्हाद पाटील, यशवर्धन सावंत भोसले, दिपक वडेर, निलेश सामानगडकर यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment