चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्टाफ अकादमीच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत छ. शाहू महाराज यांची १४८ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे अध्यक्षस्थानी होते,
प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय एन. पाटील शाहू राजांच्या कार्याचा आढावा घेताना म्हणाले, ``शाहू महाराज हे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आद्य क्रांतिकारक राजे होते. त्यांना अन्यायाची चीड व न्यायाची चाड होती. उपेक्षित, रंजले-गांजलेल्या लोकानां न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. मग ती बंधवा मजुरी असो, अस्पृश्यता निवारण, आरक्षण, शिक्षण, स्त्रियांना न्याय, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रथा-परंपरा हटविणे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. समता, शिक्षण, रोजगार, खेळ, अन्याय या गोष्टीना त्यांनी आपल्या जीवनात प्राधान्य देऊन यातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत काढली. म्हणूनच लोकराजा ही त्यांची ओळख बनली. याचा बोध आपण सर्वांनी घेतला पाहिजे.``
यावेळी सर्वानी थुंकीमुक्त परिसर अभियान शपथ घेतली. कार्यक्रमासाठी सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते. प्रा ए. डी. कांबळे यांनी सुत्रसंचालन केले व आभार डॉ. शाहू गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment