कोवाड येथील महाविद्यालयात थुंकी मुक्तीची शपथ घेण्यात आली. |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एन. एस. एस. आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने छ. लोकराजा शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने राज्यशासनाच्या वतीने थुंकी मुक्त महाविद्यालय परिसर शपथ देण्यात आली.
आपल्या देशाची संस्कृती स्वच्छ सुंदर गाव, राज्य व देश असावे यासाठी लोकराजा शाहू राजाने प्रयत्न केले. त्यांच्या जयंतीनिमित्त शासन संपूर्ण राज्यभर थुंकी मुक्त परिसर हा उपक्रम राबवत आहे. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी युकाकांनी देश स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. देशाची संस्कृती सुंदर असावी यासाठी आपण सर्वंनी नेटकजीवन अंगीकारावे असे प्रतिपदन डॉ. पाटील यांनी केले.
प्रास्ताविक डॉ. के. एस. काळे यांनी केले. स्वागत डॉ. व्ही. के. दळवी यांनी केले. डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते छ. शाहू राजांच्या प्रतिमेचे पूजन केले. तर आभार डॉ. ए. के. कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले.
डॉ. दीपक पाटील यांनी सर्वांना शपथ दिली. यावेळी प्रा. डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. आरबोळे, डॉ. बी. एस. पाटील, प्रा. एस. जे. पाटील, डॉ. काळे, डॉ. वाघमारे, प्रा. मुकेश कांबळे, प्रा. आर. टी. पाटील, प्रा. मंडले, डॉ. एस. बी. पाटील. प्रा. एस. एन. गावडे, प्रा. शिवानंद सिद्धगोंड, डॉ. सुनीता कांबळे आदी सर्व विभागांचे प्राद्यापक, प्रशसाकीय सेवक कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते. या कार्यकामाचे आयोजन प्राचार्य व्ही. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. आर. डी. कांबळे व डॉ. के. एस. काळे यांनी केले होते.
No comments:
Post a Comment