झुंज कथासंग्रहास रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2022

झुंज कथासंग्रहास रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कल्लप्पा जोतिबा पाटील.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कालकुंद्री (ता. चंदगड) येथील कथालेखक कल्लापा जोतीबा पाटील यांच्या 'झुंज' या कथासंग्रहास  'रानशिवार राज्यस्तरीय साहित्य' पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.
     पंढरपूर येथील बळीराजा प्रतिष्ठान, शेळवे या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध लेखक व कथाकथनकार  आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते खेडभाळवणी, ता.पंढरपूर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत होते.
        "साहित्य हे माणसाला समृद्ध करत असते. म्हणून माणसाने साहित्य वाचनावर भर दिला पाहिजे. त्यातूनच माणूस घडत असतो."  असे प्रतिपादन आप्पासाहेब खोत यांनी बोलताना केले. यावेळी ज्येष्ठ कवी प्रकाश गव्हाणे, शिवाजी सातपुते, लेखक दि. बा. पाटील, आबासाहेब घावटे, भास्कर बंगाळे, शेळवे कृषी विद्यालयाचे प्राचार्य मोहन गाजरे, बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गाजरे, प्रसिद्ध लेखक व कथानिवेदक अंकुश गाजरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment