साप पकडताना सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारात नाग साप घुसल्याने प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांची एकच तारांबळ उडाली.
हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात घुसलेला नाग साप पकडल्यानंतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसह सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील. |
ही घटना काल दिनांक ७ जून रोजी दुपारी ४ वाजता घडली. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाजवळ दुपारी विषारी नाग साप आल्याचे कर्मचाऱ्यांनी पाहिले. काही काळ एकच तारांबळ उडाली तथापि प्रसंगावधान राखून ढोलगरवाडी येथील सर्पालय प्रमुख सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील यांना फोन करून माहिती दिली. थोड्याच वेळात ते महाविद्यालयाच्या आवारात दाखल होत त्यांनी या जहाल विषारी नाग सापाला शिताफीने पकडले व जंगल परिसरात सुरक्षित सोडून जिवदान दिले. तत्पूर्वी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एन. सी. हिरगोंड यांनी नाग सापाविषयी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यावेळी कार्यालयीन अधिक्षक प्रशांत शेंडे, श्रीपतराव कांबळे, नंदकुमार बोकडे, प्रकाश बागडी, गोविंद नाईक, प्रदीप सावंत, माधुरी पाटील, रामदास पवार, विलास वाईंगडे, संदीप पाटील, तानाजी गवसेकर, अभिजीत चव्हाण, एम. ए. मकानदार आदी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातर्फे सदाशिव पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment