चंदगड तालुक्याचा बारावीचा निकाल सरासरी ९८.२३ टक्के, ६ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के, तालुक्याची उज्वल निकालाची परंपरा कायम - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2022

चंदगड तालुक्याचा बारावीचा निकाल सरासरी ९८.२३ टक्के, ६ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के, तालुक्याची उज्वल निकालाची परंपरा कायम


संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी 16 कनिष्ठ महाविद्यालयामधून २३७४ विद्यार्थ्यी परिक्षेला बसले होते. त्यापैकी २३३२ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालातील १६ कनिष्ठ महाविद्यालयांचा सरासरी ९८.२३ टक्के निकाल लागला. चंदगड तालुक्यामध्येही पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याचे निकालावरुन दिसून येते.

      परिक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. यापूर्वी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यी नेट कॅफे, संगणक प्रशिक्षण केंद्रे, महा ई-सेवा केंद्रावराव गर्दी करत होते. मात्र यावेळी विद्यार्थांनी आपल्या मोबाईलवरच निकाल बघणे पसंद केले. केवळ ज्यांना प्रिंटची गरज होती. त्यांनी ऑनलाईन केंदांतून निकालाची प्रिंटआऊट घेतली. कारण मोबाईलच्या 4 जी सेवेमुळे व अनलिमिटेड पॅकमुळे प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले. सध्या स्मार्टफोनचे युग असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले.

१०० टक्के निकाल लागलेली महाविद्यालये –

१) धनंजय विद्यालय व ज्युनि. कॉलेज नागनवाडी (100),

२) छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज माणगाव (100),

३) सिध्देश्वर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज कुदनुर (100),

४) श्री रवळनाथ ज्युनि. कॉलेज चंदगड (100),

५) राजश्री शाहु ज्युनि. कॉलेज शिनोळी बुद्रुक (100),

६) सह्याद्री विद्यालय अण्ड ज्युनिअर कॉलेज हेरे (100).

 

अन्य महाविद्यालये –

दि न्यु इंग्लिश स्कुल, चंदगड (98.08),
गुरुवर्य एम. बी. तुपारे ज्युनि. कॉलेज कार्वे (99.22),
श्रीमान वाय. पी. देसाई, कोवाड (98.39),
गुरुवर्य जी. व्ही. पाटील ज्युनि. कॉलेज  हलकर्णी (98.13),
रामलिंग हायस्कुल व ज्युनि. कॉलेज तुडये (97.72),
सरस्वती विद्यालय व ज्युनि. कॉलेज कालकुंद्री (96.29),
 एस. एस. टी. वाघमारे ज्युनि. कॉलेज ढोलगरवाडी (87.50), 

बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनि. कॉलेज बागिलगे (97.91),
 छत्रपती शहाजी ज्युनि. कॉलेज पाटणे (93.33),
श्री. शिवशक्ती हायस्कुल व ज्युनि. कॉलेज अडकूर (90.32).

No comments:

Post a Comment