कालकुंद्री विकास संस्था चेअरमनपदी अशोक पाटील तर सुरेखा पाटील व्हाईस चेअरमनपदी पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2022

कालकुंद्री विकास संस्था चेअरमनपदी अशोक पाटील तर सुरेखा पाटील व्हाईस चेअरमनपदी पाटील

अशोक पाटील

सुरेखा मधुकर पाटील 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी अशोक रामू पाटील तर व्हा. चेअरमनपदी सुरेखा मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एम. जे. पाटील व अशोक पाटील पुरस्कृत कल्मेश्वर शेतकरी विकास आघाडीने १३ पैकी १२ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. अशोक पाटील हे या विजयाचे शिल्पकार ठरले होते. 

             आमदार राजेश पाटील गटाचे विनोद पाटील हे एकमेव उमेदवार निवडून आले होते. चेअरमन पदासाठी अरविंद कोकितकर यांनी अशोक पाटील यांचे नाव सुचवले तर प्रताप पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी विष्णू पाटील यांनी नाव सुचवले याला शिवाजी नाईक यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रिया प्रसंगी अशोक पाटील, सुरेखा पाटील यांच्यासह नूतन संचालक अरविंद लक्ष्मण कोकितकर, विष्णू मारुती पाटील, परशराम बाबू जोशी, प्रताप आनंदराव पाटील, संजय नारायण पाटील, हरीबा जोती पाटील, विनोद अशोक पाटील, कल्लाप्पा वसंत कांबळे, शिवाजी कृष्णा नाईक, सुरेश दत्तू परीट, शोभा धोंडीबा पाटील यांची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती काटकर व महादेव पाटील यांनी काम पाहिले. निवड प्रसंगी पॅनेल प्रमुख एम जे पाटील, ईश्वर वर्पे, प्रशांत मुतकेकर, शरद जोशी, विलास शेटजी, सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, रमाकांत कोकितकर, भरमू पाटील, विनायक पाटील, भरत पाटील, वैजनाथ पाटील, प्रकाश लोहार, सटूपा मुंगुरकर आदींची उपस्थिती होती. स्वागत सचिव श्रीकांत कदम यांनी केले. आभार अरविंद कोकितकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment