डॉ. चंद्रकांत पोतदार यांची दमसा कार्यकारिणीवर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2022

डॉ. चंद्रकांत पोतदार यांची दमसा कार्यकारिणीवर निवड

डॉ. चंद्रकांत पोतदार


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक व कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांची दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या संस्थेत कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. या आधी ते दमसा पत्रिकेचे सहसंपादक होते.

त्यांचे साहित्यिक व सांस्कृतिक कार्य, वाचन चलवल, समाजप्रबोधन असे कार्य आहे. तसेच त्यांच्या 'सृजनगंध 'या समीक्षा ग्रंथास नुकताच बहिणाई च्यरिटेबल ट्रस्ट, ठाणे, मुंबई यांचा बहिणाई ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला. अध्यक्ष सुनील इंगळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment