कालकुंद्री शिवसेना शाखा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी..! - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2022

कालकुंद्री शिवसेना शाखा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी..!



चंदगड: सी. एल. वृत्तसेवा

     जिल्ह्यातील सर्वात जुनी शिवसेना शाखा म्हणून परिचित असलेल्या कालकुंद्री, ता. चंदगड येथील शाखा पदाधिकारी व शिवसैनिक सध्या सुरू असलेल्या शिवसेना पक्षांतर्गत बंडाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा बॅनर शिवसैनिकांनी गावातील मुख्य चौकात  झळकवला आहे.

           कोल्हापूर शहरातील पहिली  शाखा १९८६ साली स्थापन झाली होती. पण कालकुंद्री शाखा त्याआधी एक वर्ष म्हणजे १९८५  स्थापन झाली होती. त्यामुळे या घोषणेला महत्त्व आहे. शिवसेनेने स्थापनेपासून अनेक कार्यकर्ते, नेते निर्माण केले तथापि पुढे जाऊन ते स्वार्थी निघाल्याने इतर पक्षांच्या वळचणीला गेले. अशा अनेक घटना शिवसेनेने गेल्या छप्पन वर्षात पाहिल्या आहेत मात्र शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक ताकदीने उभी राहिली. पण स्वार्थी लाचार नेते, आमदार, खासदार, कार्यकर्ते काळाच्या ओघात लोप पावले तर काही मरण यातना भोगत आहेत. हा इतिहास आहे. आत्ताच्या फुटक्या गद्दारांनाही राज्यभरातील शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. अशा संतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. 

           गेल्या ३५ वर्षापासून शिवसेनाप्रमुख व त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेली कालकुंद्री शाखा निरंतर ठाकरे कुटुंबीयांच्याच पाठीशी राहील, अशी ग्वाही शिवसैनिकांनी दिली. यावेळी नारायण महादेव जोशी, नरसु परशराम पाटील, भरत बाबू पाटील, शंकर सांबरेकर, रामु लुमाणा जोशी, नारायण कृष्णा पाटील, प्रभाकर कोकितकर, अनंत पाटील, अर्जुन परीट, जयवंत हनुमंत पाटील, विशाल श्रीकांत पाटील, तुकाराम वरपे, संजय पुंडलिक पाटील, नारायण बाबु पाटील, कल्लाप्पा कोले, लक्ष्मण नाईक, मनोहर शिवाजी पाटील, संजय कांबळे आदी शाखा पदाधिकारी व शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment