चंदगड येथे किसान पिक विमा व शासकीय योजनांची माहीती शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2022

चंदगड येथे किसान पिक विमा व शासकीय योजनांची माहीती शिबीर संपन्न

चंदगड येथील राम मंदिर येथे मार्गदर्शन करताना अधिकारी. समोर उपस्थित शेतकरी.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          भारतीय किसान संघ, कोल्हापुर आणि तालुका कृषी अधिकारी, चंदगड तर्फे चंदगड येथील श्री राम मंदिर येथे किसान पीक विमा व विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

     यामध्ये सुभाष  आजरेकर यांनी प्रास्ताविक केले. यानंतर रिलायन्स कंपनी तर्फे विमा प्रतिनिधी महेश पाटील यांनी नाचणी, भुईमूग, भात, सोयाबीन या पिकाबद्दल प्रधान मंत्री पीक विम्याची माहिती दिली. विम्याचा अर्ज कसा भरावा आणि किती प्रिमिअम भरावा लागेल, त्यावर किती नुकसान भरपाई मिळेल याबद्दल मार्गदर्शन केले.

      एचडीएफसी इरगो कंपनीचे अमोल कांबळे यांनी फळबाग पीक विमा योजने अंतर्गत काजू आणि आंबा फळबाग विम्याची माहिती दिली. खास शेतकऱ्यांकडून काजू पीक विम्याची माहिती बद्दल मागणी करण्यात आली होती.

     तालुका कृषी अधिकारी श्री. जगताप यांनी शासनाच्या कृषी खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, कृषी अन्न प्रक्रिया उद्योग अशा अनेक योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेण्याविषयी आवाहन केले. 

      तालुका मंडळ अधिकारी तुर्केवाडी श्री. गंबरे यांनी पीक विमा आणि हुमणीच्या अवस्था व त्यावरचे उपाय याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. 

        सिद्धार्थजी शिंदे, उपाध्यक्ष, भारतीय किसान संघ, कोल्हापूर जिल्हा यांनी भारतीय किसान संघाबद्दल व कामाबद्दल माहिती दिली. त्यानी यापुढे ही अनेक शेतकरी उपयोगी  कामे व शिबिरे भारतीय संघा तर्फे भविष्यात केली जातील आसे ग्वाही दिली. ज्यानी आपल्या शेतकरी बांधवांचे ग्रामीण जनजीवन सोपे व प्रगतशील होईल.

         त्यांनी भारतीय किसान संघाला ग्रामीण भागात आणखी रचनात्मक काम करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी सहभाग घेउन, मदत व मर्गदर्शन करावे असे उपस्थित शेतकरी बांधवांना आवाहन केले, ज्यांनी कमी काळात जास्त कामे करता येतील. तालुका कृषी विभागाच्या सर्व अधिकारी वर्गाने या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.

      अनिकेत मांद्रेकर, विवेक सबनीस, सुभाष आजरेकर, मनोज नाडगौडा, दिलीप गावडे, गुरुदत्त फडणीस, मच्छिंद्र गुरव, प्रल्हाद पाटील, सौ. माधुरी सावंत भोसले, अरुण देशपांडे, सुधीर देशपांडे, शामराव कुंभार यांच्यासह शेतकरी बांधवांची विविध गावातून विशेष उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment