तहसीलदारांना अपंगांच्या मागण्यांचे निवेदन देताना राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे पदाधिकारी.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दिव्यांग, अपंग लाभार्थ्यांना त्यांच्या सवलती न देणाऱ्या चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींवर कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र, शाखा चंदगड यांच्यावतीने तहसीलदार विनोद रणवरे यांना नुकतेच देण्यात आले.
गेली वीस वर्षे दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळवून देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न अपंग विकास महासंघ करत आहे. या संघटनेच्यावतीने तहसीलदार चंदगड यांना दिव्यांग पेंशन ८०० रुपये वरून १००० करावी, २५ वर्षे वय मुलांच्या अटीतून अपंगांना सूट द्यावी, अपंगांसाठी असणारा ग्रामपंचायत ५ टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा, अंत्योदय योजनेतून अपंगांना ३५ किलो धान्य व घरकुल मिळावे, कोरोना काळातील ८५० रुपये सानुग्रह अनुदान ज्या ग्रामपंचायतीने दिले नाही त्यांनी ते तात्काळ द्यावे, तालुका व गाव स्तरावर अपंगांसाठी समाज मंदिराच्या धर्तीवर अपंग भवन बांधावे, अपंगांना ५०% घरफळा माफ करावा, आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनावर अवधूत संकपाळ, दत्तात्रय पन्हाळकर, भागोजी झेंडे, लक्ष्मण यमकर, तानाजी झेंडे आदींच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment