श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज चंदगडचा बारावीचा निकाल शंभर टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2022

श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज चंदगडचा बारावीचा निकाल शंभर टक्के

मुस्कान फकिर 

स्वाती गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील श्री रवळनाथ विद्यालय व जुनियर कॉलेज बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून यामध्ये दरवर्षीप्रमाणे कला व वाणिज्य शाखेत पहिल्या तीन क्रमांकात मुलींचीच बाजी आहे वाणिज्य शाखेत मुस्कान फकिर हिने 84 टक्के मिळवून कॉलेज मध्ये प्रथम आली द्वितीय स्वाती गावडे 76 टक्के तर तृतीय हर्षदा कुंभार 75% याशिवाय कला शाखेत स्नेहा चंदनवाले 71 टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला द्वितीय जागृती गिलबिले 64% तर तृतीय क्रमांक रूपाली मस्कर 63% गुण मिळवतयावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे तसेच 100% उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे त्याबद्दल परिसरातून कौतुक होत असून या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव राजेश पाटील  कॉलेजचे प्राचार्य डी जी कांबळे  तसेच प्राध्यापक विश्वास पाटील,  श्री पिळणकर,  राजाराम सुकये, शिंदे, एस .एस नागेश गुरव पाटील आर. एम    श्री शिवनगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.No comments:

Post a Comment