चंदगड येथील माडखोलकर महाविद्यलयात आयोजित कार्यक्रमात बोलताना संजय साबळे, शेजारी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पर्यावरण विभाग यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज मंगळवार दि.७ जून २०२२ रोजी पर्यावरण जनजागृती व स्वच्छता अभियान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संजय साबळे यानी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात युवकांची भूमिका स्पष्ट करत वसुंधरा वाचविण्याचे सर्वांना आव्हान केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी "जीओ, जिवस्य,जीवनम" या वचनपूर्तीची अपेक्षा व्यक्त केली. वसुंधरा वाचवाच पण येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य आत्मसात करा असे सांगितले. कार्यक्रमाला स्टाफ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. एस. मासाळ यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यानी मानले.
No comments:
Post a Comment