![]() |
पर्यावरण दिनानिमित्म मार्गदर्शन करताना निसर्गमित्र अनिल चौगुले |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लज मार्फत ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त " सामना इंग्लिश स्पिकींग क्लासेस, गडहिंग्लज" येथे पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक निसर्गमित्र अनिल चौगुले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनक्षेत्रपाल राजेश चौगुले हे होते. यावेळी अनिल चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण पूरक कामे करत प्रदुषणाला पायबंद घातला येतो हे सोप्या व सुलभ भाषेत सांगीतले. या प्रसंगी वनपाल अशोक डोंगरे, वनपाल सागर पाटील,
लिपिका श्रीमती रूबिना सोलापूरे, वनसेवक बसवराज कुरबेट्टी, वनसेवक आनंदा सावंत, वनसेवक प्रकाश देवडकर, वनसेवक रामचंद्र पाळेकर, वनसेवक दत्ता पाटील, मनोज पाटोळे, सामना क्लासेसचे अंकुश मद्री, दत्ताराम गावडे उपस्थित होते. प्रास्ताविक वनपाल सागर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वनक्षेत्रपाल राजेश चौगुले यांनी केले.
No comments:
Post a Comment