किणी सेवा संस्था चेअरमनपदी किणीकर तर व्हा. चेअरमनपदी दुंडगेकर - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2022

किणी सेवा संस्था चेअरमनपदी किणीकर तर व्हा. चेअरमनपदी दुंडगेकर

विरूपाक्ष बसाप्पा किणीकर

सटुप्पा गोपाळ दुंडगेकर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      किणी (ता. चंदगड) येथील जय हनुमान विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विरूपाक्ष बसाप्पा किणीकर तर व्हा. चेअरमनपदी सटुप्पा गोपाळ दुंडगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजेश पाटील समर्थक गटाने संस्थेवर १३ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले होते.

         चेअरमन निवड कार्यक्रमाचे स्वागत निवृत्त केंद्रप्रमुख वसंत जोशीलकर यांनी केले. प्रास्ताविक संस्था सचिव गणपती बिर्जे यांनी केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम व्ही पाटील यांनी काम पाहिले.

            यावेळी नूतन संचालक पुंडलिक नौकुडकर, भगवान जोशीलकर, निंगापा मोटूरे, वसंत सुतार, वैजनाथ मनगुतकर, यल्लiप्पा तरवाळ, प्रकाश जोशीलकर, दुंडाप्पा पुजारी, म्हातु कुट्रे, सुरेखा बिर्जे, जयश्री जोशीलकर यांच्यासह विजयी उमेदवारांचे समर्थक व विविध पक्षांचे कार्यकर्ते  प्रकाश पुजारी, शाहू फर्नाडिस, जॉन लोबो, संजय कुट्रे, भैरी महोनगेकर, विजय मनवाडकर, शंकर बिर्जे, विष्णू मनगुतकर, शशिकांत किणीकर, नागोजी जोशीलकर, गुंडू जोशीलकर, जानबा जोशीलकर, विष्णू गणाचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार बाळकृष्ण गणाचारी यांनी मानले.


No comments:

Post a Comment