काजूदर संघर्ष समितीची रविवारी कार्वे येथे बैठक, वाचा काय आहेत प्रमुख मुद्दे - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2022

काजूदर संघर्ष समितीची रविवारी कार्वे येथे बैठक, वाचा काय आहेत प्रमुख मुद्दे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

                मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील डायग्नोस्टिक सेंटर  (मेडिकल हाॅल) येथे बळीराजा काजूदर संघर्ष समितीीच्या वतीने रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

             यावर्षीचा काजू हंगाम संपला तरी अपेक्षित दर नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अजुनही काजू साठवलेली आहे. काही ठिकाणी खरेदीदाराकडू काटामारीच्या घटना समोर आल्या आहेत. काय होईल तो दर देतो असे सांगून शेतकऱ्यांची काजू उचलुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. परदेशी काजूचा फटका इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे काजू आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्यांवर चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. तरी सर्व काजूदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या बैठकीला कार्वे येथे उपस्थित रहावे असे आवाहन काजूदर संघर्ष समितीच्या वतीने नितीन पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment