माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेकडील ९ विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2022

माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेकडील ९ विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांचेसमवेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेकडील ९ विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. आज या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांमध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना यापुढेही आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून यशाचा आलेख नेहमी उंचावत ठेवावा असे मार्गदर्शन केले. वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा. एस. के. सावंत यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन करत विद्यापीठाने दिलेली शिष्यवृत्ती हे त्याचेच एक प्रतिबिंब आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी केले तर आभार डॉ. एस. डी  गोरल यांनी मानले. याप्रसंगी डॉ. टी. ए. कांबळे, पूजा देशपांडे, आर. एस. पाटील, अर्जुन गावडे व इतर उपस्थित होते.No comments:

Post a Comment