विलास कागणकर यांना 'आचार्य अत्रे- उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2022

विलास कागणकर यांना 'आचार्य अत्रे- उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार जाहीर

विलास कागणकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा मानाचा आचार्य अत्रे तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार तावरेवाडी (ता. चंदगड) येथील दैनिक पुण्यनगरीचे चंदगड तालुका प्रतिनिधी विलास कागणकर यांना जाहिर झाला आहे. 

        दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांना प्रसिद्धी व तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून विलास कागणकर गेल्या काही वर्षापासून अखंडपणे करत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment