कृष्णा डेळेकर यांना वनपालपदी पदोन्नती, चंदगड परीमंडळचे वनपाल म्हणून नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2022

कृष्णा डेळेकर यांना वनपालपदी पदोन्नती, चंदगड परीमंडळचे वनपाल म्हणून नियुक्ती

वनपाल पदी पदोन्नती बद्दल कृष्णा डेळेकर यांचे अभिनंदन करताना रेंजर नंदकुमार भोसले, नगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सचिन बांदिवडेकर व मान्यवर


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           गेल्या दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या चंदगड परिमंडळ वनपाल (फॉरेस्टर) पदी कृष्णा डेळेकर यांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली. डेळेकर यापूर्वी वनरक्षक म्हणून कार्यरत होते. डेळेकर यांच्या खात्यातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना वरीष्ठ पदावर बढती मिळाली. 

        या बद्दल वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांचे अध्यक्षतेखाली चंदगडचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व लाकूड ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सचिन बांदिवडेकर यांचे हस्ते चंदगड वन विभागाच्या कार्यालयात डेळेकर स्वागत व अभिनंदन करण्यात आले. चंदगड परीमंडळाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या वनपाल अनिल वाजे यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी अनिल वाजे यांचाही सन्मान करण्यात आला. 

       कृष्णा डेळेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी भरत निकम (वनपाल मिरवेल), सागर पोवार (वनरक्षक चंदगड), कैलास सानप (वनरक्षक मिरवेल), खंडू कातखडे (वनरक्षक सुळये), सचिन होगले (वनरक्षक इसापूर), सुषमा सरवदे (वनरक्षक कानूर), अस्मिता घोरपडे (वनरक्षक उमगाव), कल्पना पताडे (वनरक्षक कुरणी बुजवडे), संजय गावडे (लेखापाल), वनमजूर बुधाजी कांबळे, नितीन नाईक, बाळू दळवी, गुंडू देवळी, सोमा दळवी, डाटा ऑपरेटर निलेश साळुंखे यांचे सह विठोबा गावडे, शब्बीर मुल्ला, सलमान मुल्ला, बाळू मुल्ला, इस्माईल मुल्ला, अरुण गवळी, धोंडिबा तेजम, संजू मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment