आंबोली बाबा फॉल्स नजीक बेळगावच्या तरूणाना तीन वाघांचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2022

आंबोली बाबा फॉल्स नजीक बेळगावच्या तरूणाना तीन वाघांचे दर्शन

आंबोली बाबा फॉल्स नजीक बेळगावच्या तरूणांना  दिसलेला वाघ


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 आंबोलीमध्ये असणारा बाबा फॉल्स बघून येताना इसापूर -चौकूळ रस्त्यावर बेळगावच्या तीन तरुणांना तीन वाघांचे दर्शन घडले .

बेळगावचे तीन युवक बाबा फॉल्स बघून बेळगावला सायंकाळी साडेसहा वाजता परत येत होते.त्यावेळी थोडा अंधार पडत आला होता.अंधारात अचानक त्यांना दोन चकाकणारे डोळे दिसले. ते पाहून त्यांना समजले की येथे कोणता तरी प्राणी आहे.त्यांनी आपली कार सावकाश पुढे नेल्यावर त्यांना साक्षात वाघाचे दर्शन घडले.त्या वाघाचा तरुणांनी धाडसाने व्हिडिओ काढला. एक वाघ पाहिल्यावर रस्त्याच्या कडेच्या जंगलात आणखी दोन वाघ असल्याचे ध्यानात आले.त्यापैकी एका वाघाचा देखील व्हिडिओ या तरुणांनी घेतला .दोन वाघांचे व्हिडिओ या तरुणांना घेता आले पण तिसरा वाघ मात्र क्षणार्धात जंगलात गायब झाला . कारमधे बसूनच या तरुणांनी व्हिडिओ काढला.वाघ बघताना एक वेगळा आनंद या तरुणांना झाला होता पण त्याच वेळी भीतीही मनात दाटली होती अशी माहिती या तरुणांनी दिली.जावेद किल्लेदार या तरुणाने व्हिडिओ काढला.कारमध्ये अकिफ बादशा आणि जावेद हे तरुण देखील होते.





No comments:

Post a Comment