कोवाडवरील महापुराचे संकट तात्पुरते टळले..? प्रांताधिकारी वाघमोडे यांची कोवाडला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2022

कोवाडवरील महापुराचे संकट तात्पुरते टळले..? प्रांताधिकारी वाघमोडे यांची कोवाडला भेट

कोवाड येथील व्यापारी व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करताना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे सोबत सरपंच अनिता भोगण, उपसरपंच जाधव, व्यापारी संघटना अध्यक्ष दयानंद सलाम आदी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

             आज दि. १४ जुलै २०२२ रोजी कोवाड जुना बंधारा नजीक पाणी पातळी कालच्या तुलनेत एक फुट वाढली असली तरी पावसाचा जोर थोडा ओसरल्यामुळे कोवाड बाजारपेठ व नागरिकांवरील महापुराचे संभाव्य संकट तात्पुरते टळले असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
आज दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कोवाड येथील जुन्या बंधार्‍यांनाजीक असलेली पाण्याची पातळी

       आज सायंकाळी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी कोवाड येथे भेट देऊन व्यापारी व नागरिकांशी संभाव्य पुरस्थिती संदर्भात संवाद साधला. यावेळी सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, मंडल अधिकारी शरद मगदूम, तलाठी राजश्री पचंडी, ग्रामसेवक जी एल पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी वाघमोडे यांनी पावसाचा जोर थोडा ओसरला असल्यामुळे महापुराचे संकट तात्पुरते टळले असले तरी मागील तीन वर्षाचा अनुभव पाहता व्यापारी व नागरिकांनी येत्या काळात सतर्क रहावे. असे आवाहन केले. दरम्यान गेल्या २४ तासात ताम्रपर्णी नदीपात्रातील जुन्या बंधाऱ्याजवळील पाणी पातळी एक फूट वाढली आहे. ती  पश्चिम भागातील पाणी अद्याप पूर्व भागात पोहोचले नसल्यामुळे  आणखी वाढण्याची शक्यता आहे. तथापि पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे मोठा धोका टळल्याने व्यापारी व ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.No comments:

Post a Comment