५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, काय आहे कारण.........वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2022

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, काय आहे कारण.........वाचा.....

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी दि. २० जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार होती. तथापि सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी, पूर सदृश्य स्थिती व भूस्खलन यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळी जाण्यास अडथळा व धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

        राज्यातील या स्थितीमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षा पुढे ढकलली आहे. पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे आता ही परीक्षा २० ऐवजी ३१ जुलै २०२२ रोजी पूर्व नियोजित केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश पत्र पुढील तारखेसाठी सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. अशी माहिती शैलजा दराडे, आयुक्त- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सर्व जिल्ह्यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी या बदलाची नोंद संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक व मार्गदर्शक, विद्यार्थी, पालक यांनी घ्यावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment