१५ जूलैपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा - तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2022

१५ जूलैपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा - तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ यांचे आवाहन

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

              भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्य चंदगड तालूक्यामध्ये आज दि. १५ जुलै पासून तीसरा बुस्टर डोस देण्यात येत असल्याची माहिती चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यानी दिली.

          आज दि. १५ जूलै पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत हा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. यामध्ये  १८ ते ५९ वयापर्यंतच्या सर्वाना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ६० वर्ष वयोगटावरील ही सर्वाना बूस्टर डोस देण्यात येत आहे. या बूस्टर डोस साठी ज्यानी दुसरा घेऊन ६ महिने झाले आहेत अशा १९ ते ५९ वर्ष वयोगटातील व्यक्ती पात्र असणार आहेत. त्याचबरोबर हा बूस्टर डोस चंदगड तालूक्यातील सर्व ग्रामिण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच गावामध्ये पण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

         तरी या बूस्टर डोसचा  लाभ संबधीत नागरिकांनी घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे व चंदगड तालूका वैद्यकिय आधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment