विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजायला हवी - माजी प्राचार्य निळपणकर, माडखोलकर महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2022

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजायला हवी - माजी प्राचार्य निळपणकर, माडखोलकर महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

माडखोलकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा कार्यक्रमात बोलताना माजी प्राचार्य आर.एस. निळपणकर, व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य व प्राध्यापक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         जीवन आनंददायी असते. तरुण वयात जीवन सौंदर्याचे दर्शन घडविणारे महाविद्यालयीन जीवन मौल्यवान असते विद्यार्थ्यांनी सदैव ध्येयप्राप्तीसाठी मार्गक्रमण करावे.आपण समाजाचेही देणे लागतो ही सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष करून आजच्या मूल्यांच्या पडझडीच्या काळात संवेदनशील वृत्तीचा विद्यार्थी घडवणे ही मोठी जबाबदारी आहे ."असे प्रतिपादन माजी प्राचार्य आर.एस.निळपणकर यांनी केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

         प्रारंभी प्राचार्य डॉ.पी. आर. पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ही संस्था वैचारिक भूमिकेतून आणि समर्पित वृत्तीच्या शिक्षकांनी निर्माण केलेली संस्था आहे. संस्थेचा पाया भक्कम आहे. या संस्थेचा उत्तरोत्तर उत्कर्ष घडवण्याचे दायित्व आपल्या सर्वांच्या वर आहे असे मत व्यक्त केले. 

          प्रारंभी खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक कै. प्रा. पी. सी. पाटील व नेसरीचे प्रा. संजय कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  प्रास्ताविकात  समन्वयक प्रा. डॉ. आर. एन. साळुुंखे यांनी २५ वर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीत माजी विद्यार्थी व समाजाने दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. यावेळी प्रा. डॉ. के. एन. निकम, प्रा. एस. के. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण वाटंगी, अश्विनी चौगुले, संदीप नाईक, शांताराम हजगुळकर, अजय सातर्डेकर, अमोल गावडे, पांडुरंग माईनकर, अभिजीत गुरबे, विशाल सामंत, भानुरास खेबुडे, सुनील नाडगौडा, नागोजी गावडे, मनश्री कांबळे, श्रद्धा कुराडे या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रा. डॉ. एन. एस. मासाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी आभार मानले. मेळाव्यास प्राध्यापक कर्मचारी व माजी विद्यार्थ्यी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment