अध्यापिका सौ. अनिता रामचंद्र पाटील यांचा सत्कार करताना मान्यवर. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक जयराम मास्तर यांच्या कुटुंबाचे चंदगड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे शिक्षक असलेले मुलगे व सुना यांनीही शैक्षणिक कार्यास वाहून घेतले असे प्रतिपादन माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी केले. ते विद्यामंदिर कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील शाळेच्या अध्यापिका सौ. अनिता रामचंद्र पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रोहिणी चंद्रकांत पाटील होत्या.
या प्रसंगी माजी उपसभापती मनीषा शिवणगेकर, इंजिनिअर अमोल कुट्रे, विनायक पाटील, जी. व्ही. दैठणकर, रमेश हुद्दार, सरपंच सुधीर गिरी, अडत व्यापारी प्रकाश शंकरराव पाटील, जि प सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, अध्यापक बाबुराव धामणेकर, रोहिदास पाटील, द. ना. नाईक, माजी सैनिक उत्तम पाटील, आप्पाराव पाटील, श्रीकांत वै पाटील, सुखदेव भातकांडे, मनोहर नारायण पाटील, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आजी माजी केंद्रप्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, कडलगे ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शंकर पाटील यांनी केले. आभार अनिल जयराम पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment