जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पगार चार महिने थकले, डॉक्टर करणार अंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2022

जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पगार चार महिने थकले, डॉक्टर करणार अंदोलन

कोल्हापूर जि. प.चे सीईओ संजयसिंह चव्हाण यांना थकीत पगार त्वरित करावेत या मागणीचे निवेदन देताना महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' संघटनेचे पदाधिकारी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांचे वेतन गेल्या वर्षभरात कधीच वेळेवर झालेले नाही. सध्या नियमित वैद्यकीय अधिकार्‍यांपैकी ४० अधिकार्‍यांचे 'मे' पासूनचे वेतन प्रलंबित आहे, तसेच कंत्राटी २५ वैद्यकीय अधिकार्‍यांना फेब्रुवारीपासूनचे वेतन मिळालेले नाही. वेतन प्रलंबित असल्याने विविध कारणांसाठी काढलेल्या कर्जाच्या संदर्भात बँकेकडून सतत मानहानी सहन करावी लागत आहे. 

            या संदर्भात वारंवार लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. तरी या संदर्भात प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्यास आंदोलन करणार असल्याचे, निवेदन महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण जिल्हा वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश साळे यांना  दिले.  जिल्हा परिषदेतील ३८ वैद्यकीय अधिकारी कंत्राटी आहेत. नियमित आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही पगार थकीत अनुदानाअभावी रखडले वेतन त्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही गेल्या दोन महिन्यांपासून पगार थकीत आहे. कंत्राटी डॉक्टरनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेऊन थकीत वेतनाकडे लक्ष वेधण्याचाप्रयत्न केला. परंतू अनुदान प्राप्त न झाल्यामुळे आम्ही तर कोठून पैसे देणार? असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यामुळे आज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सकाळी रुग्णांची तपासणी करून दुपारी वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषदेसमोर जमले. त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आसिफ सौदागर, उपाध्यक्ष अस्लम नायकवडी, डॉ. हर्षद शिकरे, डॉ. उत्तम मदने, डॉ. जेसिका अँड्र्यूज, डॉ. शोभा सूर्यवंशी, डॉ. रोहिणी बरगे, डॉ. अरविंद पठाणे आदीसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment