चंदगड पंचायत समितीमध्ये कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व इतर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय चंदगड मार्फत शुक्रवार ०१/०७/२०२२ रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्व. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन चंदगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालूका कृषी अधिकारी सुनिल जगताप, मंडळ कृषी अधिकारी यशोदिप पोळ व मंडळ कृषी अधिकारी विजय गंबरे यांचे मार्फत करणेत आले.
यावेळी गट विकास अधिकारी श्री. बोडरे म्हणाले, ``तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या गरजेप्रमाणे पिक घेऊन अधिकाधीक उत्पादन व उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला पाहीजे. चंदगड तालुक्यात जास्त प्रमाणात जैवविविधता असल्याने शेतकऱ्यांनी जंगली भाज्यांची लागवड करावी. त्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्यापासून चांगले उत्पन्न मिळेल.
मंडळ कृषी अधिकारी यशोदीप पोळ यांनी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादनात व उत्पन्नात कशी वाढ करता येईल. याबाबत मनोगत व्यक्त केले. प्रगतशिल शेतकरी सदानंद गावडे (रा. नांदवडे, ता चंदगड) यांनी मनोगत व्यक्त केले तर किरण पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास चंदगड तालूक्यातील शेतकरी, पंचायत समिती चंदगड येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच तालूका कृषी कार्यालय चंदगड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन सुमेश जज्जरवार यांनी केले.
No comments:
Post a Comment