चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तावरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री मंगाईदेवी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सत्ताधारी गटाचे उमेश संजय कागणकर तर व्हाईस चेअरमनपदी परशराम सुबराव हसबे यांची निवड करण्यात आली.
हि निवड प्रक्रिया शुक्रवारी सेवा सोसायटीच्या सभागृहात पार पडली. निवड प्रक्रियेसाठी चंदगड निबंधक अनुराधा काटकर सह शैलैश सावंत उपस्थित होते. चेअरमन पदासाठी उमेश कागणकर यांचे नाव सटूप्पा गोपाळ पाटील यांनी सुचवले तर व्हाईस चेअरमन पदासाठी परशराम हसबे यांचे नाव देवाप्पा दत्तू कागणकर यांनी सुचवले.
यावेळी सदस्य जानबा पाटील, सटूपा पाटील, देवाप्पा कागणकर, रामचंद्र खनगुतकर यासह भागोजी कागणकर, शिवाजी कागणकर, तानाजी कागणकर, मनोहर खनगुतकर, सटुप्पा कागणकर, संभाजी पाटील, शिवाजी आवडण, तानाजी हसबे, मारुती पाटील, वसंत कागणकर, आशीर्वाद कागणकर, मनोहर कागणकर व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार परशराम बोकडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment