मालवण येथील पॉलिटेक्निकमधील प्रवेश प्रक्रियेला ७ जुलैपर्यत मुदत वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2022

मालवण येथील पॉलिटेक्निकमधील प्रवेश प्रक्रियेला ७ जुलैपर्यत मुदत वाढ


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण (जि. सिंधुदूर्ग) (3010) येथे प्रथम वर्ष डिप्लोमा तसेच थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा, या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. फर्स्ट इयर डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.०७ जुलै पर्यन्त वाढविण्यात आली असून डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी अंतिम मुदत दि. ०८ जुलै आहे.   
           ऑनलाइन पद्धतीमध्ये मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. कोविड-१९ च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजना मध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या साठी E-SCRUTINY या पर्यायचा निवड करणे अशी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येत आहे. Physical Scrutiny या पर्याय मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून, प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
          शासकीय तंत्रनिकेतन मालवण हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शासकीय संस्था असून संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह १.स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), २. संगणक (Computer) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता -६०) , ३ विद्युत (Electrical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ४. अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ५. यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०) व ६. अन्न तंत्रज्ञान (Food Technology) (प्रवेश क्षमता -२०) या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी  प्रवेश प्रक्रियेसाठी विहित मुदतीत प्रवेश अर्ज   सुविधा केंद्राचा (FC 3010) लाभ घेण्यात यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे. अधिक महितीसाठी प्रा. डी. एन. गोलतकर - 9764513133, डॉ. वाय. व्ही. महाडीक - 9423682846 यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment