कालकुंद्री गावानजीक ओढ्यावरील मोरीच्या दुतर्फा पडलेले मोठमोठ्या आकाराचे खड्डे व त्यात साठलेले पाणी अपघातांना आमंत्रण देत आहे. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री ते कागणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांत पाणी साठल्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत असून येथून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर वाहनांच्या चाकांतून उडणाऱ्या पाण्यामुळे रंगपंचमीचा अनुभव मिळत आहे.
कालकुंद्री गावा नजीक असलेल्या ओढ्यावरील मोरीच्या दोन्ही बाजूस योग्य पद्धतीने व पुरेसा भराव टाकून त्यावर डांबरीकरण करणे गरजेचे होते. तथापि ठेकेदाराकडून घिसाडघाईने काम उरकण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून याचा नाहक त्रास प्रवासी वाहनधारक व पादचारी यांना भोगावा लागत आहे. चंदगड तालुक्याला कुदनूर, राजगोळी, दड्डी मार्गे हत्तरगी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अधिक वर्दळीचा व अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. खड्डे अधिक धोकादायक होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment