तेऊरवाडी (एस. के. पाटील)
चंदगड तालक्यामध्ये विशेष अतिसार पंधरवडा १ जुलै ते १५ जुलै २०२२ या कालावधीत राबविण्यात येत असल्याची माहितीचे चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली.
अतिसारामूळे होणारे बाल मृत्यू शून्यावर पोचविणे हे हया अंतिम मोहिमेचे ध्येय आहे. अतिसार ही बालकांच्या आजारामधील एक गंभीर समस्या असून अहवालानुसार देशामध्ये दरवर्षी पाच वर्षाखालील एक लाख बालकांच्या मृत्यू अतिसारामुळे होतो. याच्या प्रतिबंधासाठी तसेच जलद व प्रभावी उपचारासाठी जिल्हामध्ये व चंदगड तालुक्यामध्ये खालील प्रमाणे विविधउपाययोजनाची या पंधरवडया अंतर्गत अमलबजावनी होणार आहे. सदर पंधरवडयामध्ये पाच वर्षाखालील बालकांना आशाव्दारे बालकांना भेटी देऊन ओ. आर. एस. (ORS) पाकिटांचे वाटप करणे, पालकांना प्रात्यक्षिक दाखवणे, आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. (ORS) व झींक कोपरा प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. हात स्वच्छ धूण्याचे प्रात्यक्षिक शाळा व अंगणवाडी मध्ये देण्यात येणार आहे. सदर पंधरवडयामध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील अतिसाराचे बालके शोधून उपचार देण्यात येईल व तीव्र अतिसार असलेले बालकांना संदर्भित करणेत येईल. तालुकास्तरावर वैदयकिय अधिकारी समूदाय आरोग्य अधिकारी तालुका स्तरीय पर्यवेक्षक प्रा. आ. केंद्राकडील सर्व कर्मचारी आशासेविका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. चंदगड तालुक्यामध्ये पाच वर्षा खालील १४००० (चौदा हजार बालकांना (ORS)) हे वाटप करण्यात येणार आहे. पाच वर्षाच्या आतील बालकांमध्ये अतिसार धोके टाळता यावेत व बालकांच्या अतिसाराच्या गंभिरतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी तालुक्यातील नागरिकांनी ही मोहिम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment