ग्रामपंचायत कामगार मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2022

ग्रामपंचायत कामगार मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन

सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना संघटनेचे पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार संघटनेचा महाआनंद मेळावा व निवृत्त कर्मचारी सत्कार कार्यक्रम नुकताच ग्रामपंचायत कोवाड येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे होते.

          प्रास्ताविक व स्वागत संघटनेचे चंदगड तालुकाध्यक्ष परशराम जाधव यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी गेली अनेक वर्षे रखडलेला ग्रामपंचायत कामगारांना किमान वेतन कायदा लागू केल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून सर्वानुमते संमत करण्यात आला. सर्वांना साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

          यावेळी कोवाड ग्रामपंचायतचे लिपिक मारुती कल्लाप्पा नाईक तसेच किटवाड ग्रामपंचायतचे नळ पाणीपुरवठा कामगार विठोबा शंकर दळवी यांचा सेवानिवृत्ती निमित्त राज्य, जिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, तानाजी वाईगडे, सम्राट मोरे आदींची समयोचीत भाषणे झाली. मेळाव्यास सचिन एकनाथ राघोजी, संजय दळवी, संजय कांबळे यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सागर रामचंद्र पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment