कालकुंद्री येथील शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर आनंदित झालेले केंद्र शाळेतील विद्यार्थी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शिक्षक संचयनी फंड यांच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या व पेन वाटप करण्यात आले. ३० वर्षे सुरू असलेल्या या शिक्षक संचयनीने आतापर्यंत शाळेच्या एका वर्गाला फरशी बसवणे, कोरोनाकाळात घरोघरी साबण वाटप व आता सामाजिक बांधिलकीतून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
अध्यक्षस्थानी संचयनीचे अध्यक्ष जोतीबा यल्लाप्पा पाटील होते. मुख्याध्यापिका माया पाटील व सविता कुंभार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक के. जे. पाटील यांनी केले. यावेळी आर. आर. पाटील, लक्ष्मण सातापा जोशी, राजाराम तुकाराम जोशी, अरविंद लक्ष्मण कोकितकर, अर्जुन सुबराव मुतकेकर, विजय यल्लापा पाटील, ज. ल. पाटील, विठोबा मुंगुरकर, अर्जुन पांडुरंग पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अध्यापक मोहन गाडीवड्डर यांनी केले. आभार जा. रा. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment