स्वतःला ओळखून उंच आकाशात भरारी घ्या - प्रा. ए. डी. कांबळे, माडखोलकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2022

स्वतःला ओळखून उंच आकाशात भरारी घ्या - प्रा. ए. डी. कांबळे, माडखोलकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

माडखोलकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभावेळी बोलताना प्राचार्य पी. आर. पाटील, शेजारी प्रा. ए. डी. कांबळे, विभाग प्रमखु प्रा. डॉ. एस. डी. गोरल.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही, यशाला कधीही अति जवळचा मार्ग नसतो. स्वतःचे व्यक्तीमत्व आपण विकसित केले तर, निश्चि त यश संपादन करता येते  असे प्रतिपादन र. भा. माडखोलकर महावि महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा. ए. डी. कांबळेयांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणनू बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावि द्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.

            प्रास्ताविक विभाग प्रमखु प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. प्रा. ए. डी. कांबळे पुढु म्हणाले, ``मिळालेल्या क्षणात जो गुणित करतो, तो तरुण आणि जो त्याची नासाडी करतो तो म्हातारा, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या क्षणात गुणित करून कायम तरूणच राहण्याचा प्रयत्न करावा. सध्याच्या अधंकारमय परिस्थितीतन मार्ग काढण्यासाठी आपले नाणे खणखणीतच ठेवले पाहिजे. परिस्थितीचे रडगाणे न गाता आपणाला जीवनामध्ये यश मिळवायचे आहे. हे निश्चित केल्याशिवाय पर्यायच नाही असे सांगितले. 

       प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षपदावर बोलताना म्हणाले, जीवनामध्ये जर आपणाला यशस्वी व्हायचेअसेल तर संकटावरती मात करता आली पाहिजे.`` या प्रसगंगी मंजुनाथ गावडे, स्वस्तिक धांटोंबे, सुचिता गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुश्मिता झेंडे तर सुचिता गावडे हिने आभार मानले. 

No comments:

Post a Comment