टॅगचे समन्वयक सागर खाडे शिक्षकांना विविध कृतींची माहिती देताना |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत सहावी टॅग (टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप) मीटिंग केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे नुकतीच पार पडली. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मीटिंगमध्ये टॅगचे केंद्र समन्वयक सागर खाडे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. ॲक्टिव्हिटी कन्वर्सेशन द्वारे मीटिंग आनंदी वातावरणात पार पडली. यावेळी कोवाड केंद्रातील सर्व शाळातील शिक्षकांनी उपस्थित राहून इंग्रजी भाषेतील प्रात्यक्षिक कृतींमध्ये सहभाग घेतला. याचा उपयोग शिक्षकांना शाळेतील इंग्रजी विषयाच्या दैनंदिन अध्यापनात होणार आहे.
No comments:
Post a Comment