सौ. अनिता पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त शनिवारी कडलगे येथे गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2022

सौ. अनिता पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त शनिवारी कडलगे येथे गौरव


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

               मराठी विद्या मंदिर कडलगे बुद्रुक शाळेच्या अध्यापिका व कडलगे गावच्या स्नुषा सौ. अनिता रामचंद्र पाटील या २५ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा गौरव सोहळा शनिवार दि. २३ रोजी ११ वाजता वि. मं कडलगे बुद्रुक शाळेत आयोजित करण्यात आला आहे.

      शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रोहिणी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात  सौ. अनिता पाटील यांचा सत्कार माजी जि. प. सदस्या सुजाता पाटील व सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील या दांपत्याच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाटील, माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार, ॲड. एस. एल. पाटील, माजी सभापती ॲड. अनंत कांबळे, उपसभापती मनीषा शिवनगेकर, सरपंच सुधीर गिरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आर. जे. पाटील, मुख्याध्यापिका सुधा पाटील केंद्रप्रमुख बाळू प्रधान यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment