घाटात अडकलेला कंटेनर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड - दोडामार्ग मार्गावर असलेल्या तिलारी घाटात काल सायंकळी एक कंटेनर अडकून सुमारे तीन तास वहातूक खोळंबली. अखेर जेसीबीच्या साह्याने कंटेनर बाजूला करून वहातूक सुरळीत करण्यात आली.
तिलारी घाटातुन अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना गोवा येथे जाण्यासाठी येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून अनेक मालवाहतुक करणारी वाहने या धोकादायक असलेल्या तिलारी घाटातुन ये-जा करतात. ही वाहने घाटात अडकून अनेक वेळा वाहतुक बंद होणे, इतर वाहनांचा खोळंबा होणे, हे प्रकार सुरु असताना रविवारी रात्री एक कंटेनर वळणार अडकून राहिला. त्यामुळे एस. टी. बसेस खाजगी वाहने तीन तासापेक्षा जास्त काळ अडकून पडली. अखेर पोलिस स्थानिकांनी जेसीबी मशिन घेऊन हा कंटेनर मागे ढकलून वाहतुक पूर्ववत केली.
No comments:
Post a Comment